संविधान गौरव दिन New

संचालनालय वैद्यकिय शिक्षण व संशोधन यांच्या अधिनस्त परिचर्या शिक्षण संस्था , सर जे जे रुग्णालय आवार मुंबई येथे सकाळी १०.००वा. संविधान गौरव दिन संपन्न झाला.

या प्रसंगी महविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.निलिमा सोनावणे ,विद्यार्थी कल्याण संघटनेचे मार्गदर्शक डॅा शरद पंडीत आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी , इत्यादी सर्व कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ऊपस्थित होते. संविधानाच्या प्रस्तावना वाचनाने कार्यक्रमाचा प्रारंभ केला.

संविधानिक महासत्ता असलेल्या भारताची जागतिक प्रतिमा,भारतिय महिलाना संविधानाने बहाल केलेले , डॅा बाबासाहेब आंबेडकरांचे भारताला सामाजिक व आर्थिक महासत्ता बनविण्यास योगदान तसेच नागरिकांच्या कर्तव्य व जबाबदार्या याबाबत प्राचार्या डॅा निलिमा सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.

याच दिवशी मुंबई वर झालेल्या अतिरेकी हल्यात शहिद झालेल्या जवानाना व नागरिकांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.